पुरंदर ! वाल्हे येथील पालखी तळाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
पुरंदर - पुरंदर तालुक्यात महर्षी वाल्मीकी ऋषींची कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र वाल्हे येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पायी पालखी सोहळा येत्या १७ जून रोजी मुक्कामी विसावणार आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी येथील पालखी तळाला भेट देऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी पालखी तळाच्या स्वच्छतेसह या ठिकाणी वीज पाणी व आरोग्य सेवेसह पालखी मार्गातील रखडलेली कामे तसेच सुकलवाडी मार्गे गुळुंचे नीरा रस्त्याची डागडुजी करण्यासंदर्भात संबंधित विभागाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. तर या ठिकाणी रेल्वेच्या भुयारी मार्गालगत ढासळलेले दगड गोटे हटविण्यासह पालखी काळात पाऊस झाल्यास येथील भुयारी मार्गात पावसाचे पाणी साठून राहणार नाही यासाठी रेल्वे प्रशासनानेही दक्षता घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी पोलीस अधीक्षक अंकित गोयल जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद पालखी सोहळा प्रमुख अॅड विकास ढगे विश्वस्त योगेश देसाई पुरंदर दौंडच्या उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला प्रभारी तहसीलदार दत्तात्रेय गवारी पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विक्रम काळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपभियंता स्वाती दहिवाल जेजुरीचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले तलाठी निलेश अवसरमोल शाखा अभियंता सुभाष चौरे यांसह सुर्यकांत भुजबळ सुनील पवार दीपक कुमठेकर त्रिंबक भुजबळ शरद चव्हाण धनंजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.