'करंजे' त उद्योगमेळावा संपन्न; महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.
सोमेश्वर-करंजे : बारामती तालुक्यातील करंजे ग्रामपंचायत कार्यालय येथे शुक्रवार दि ५ रोजी सरपंच जया गायकवाड यांनी आयोजित केलेल्या उद्योगमेळाव्याचे आयोजन केले होते यामध्ये करंजे ग्रामस्थ महिलांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला होता... तसेच पी टी काळे उद्योग व्यवसाय मार्गदर्शक म्हणून तर बारामती तालुक्यातील उद्योग व्यापार विभागाचे तालुका उपाध्यक्ष प्रकाश शेठ चांदगुडे तसेच उद्योग व्यापार आघाडीचे सरचिटणीस शिवाजीराव काळखैरे यांनी मार्गदर्शन केले तर ग्रामीण भागातील तरुणांना महिलांना शेतकऱ्यांना शासकीय अनुदानातून उद्योग उभा करण्याची सुवर्णसंधी असून उद्योगासाठी संपूर्ण तांत्रिक माहिती कर्ज प्रकरण बँक लोन उत्पादन प्रक्रिया इत्यादी बाबीची पूर्तता करून असे त्यांनी बोलताना सांगितले , बारामती तालुक्यातील प्रत्येक गावात सरपंचाच्या नेतृत्वाखाली किमान दहा उद्योग उभा करणार असल्याची माहिती मेळाव्यात बोलताना पी टी काळे यांनी दिली