Type Here to Get Search Results !

पिंपळी-लिमटेक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी आश्विनी सुनिल बनसोडे यांची बिनविरोध निवड

पिंपळी-लिमटेक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी आश्विनी सुनिल बनसोडे यांची बिनविरोध निवड
बारामती: पिंपळी गावचे विद्यमान उपसरपंच आबासाहेब देवकाते पाटील यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर ग्रामपंचायत पॅनेल प्रमुख व छत्रपती कारखाना संचालक संतोषराव ढवाण पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती चे मा.संचालक रमेशराव ढवाण पाटील आदींनी ग्रामपंचायत सदस्य बैठकीत सदस्या अश्विनी बनसोडे यांच्या नावाची घोषणा केली.
       उपसरपंच निवड ही निवडणूक प्रक्रियेने पार पडली. उपसरपंच पदासाठी एकमेव अश्विनी सुनिल बनसोडे यांचा अर्ज आल्याने निवड सभेत बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास विकास अधिकारी बाळासाहेब भोईटे यांनी घोषित केले.
     उपसरपंच निवडणूक बिनविरोध करून पिंपळी विविध विकास सोसायटीचे मा.चेअरमन अशोकराव देवकाते पाटील यांनी चांगला संदेश दिला.
उपसरपंच निवडीसाठी सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ केसकर यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले.
           निवड सभेत अभिनंदन ठराव संचालक संतोषराव ढवाण पाटील यांनी मांडला. याप्रसंगी त्यांनी मनोगत व्यक्त करताना 
पिंपळी लिमटेक गावात त्यांनी आठ्ठेचाळीस महिला बचतगट स्थापन केले आहेत. तसेच महिलांची आरोग्य शिबीरे, हिमोग्लोबिन तपासणी, दिपावली सणानिमित्ताने कुपन वाटप, विविध गुण स्पर्धा रांगोळी, वाचन त्यावर प्रोत्साहनपर बक्षिसे, ग्रामपंचायत मार्फत महिलांना विविध कौशल्य प्रशिक्षण साठी मदत, बचतगटासाठी बँकेमार्फत मार्फत कर्जनुदान व पंचायत समिती बचतगट समूदाय मार्फत अनुदान व व्यवसाय,राष्ट्रमातांच्या जयंत्या साजरीकरण ,प्रबोधन कार्यक्रम, सामाजिक जनजागृती आदी उपक्रम हाती घेतले असून ग्रामपंचायत माध्यमातून गावातील सार्वजनिक कार्यात देखील त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन निवड केल्याचे  ढवाण पाटील यांनी सांगितले व त्यांनी पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मावळते उपसरपंच आबासाहेब देवकाते पाटील यांनी नवनिर्वाचित उपसरपंच अश्विनी बनसोडे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व आभार मानले.
     पिंपळी-लिमटेक गावचा सर्वांगीण विकास संचालक,सरपंच व सर्व सदस्य यांच्या मदतीने करू तसेच महिला व युवतींना वेगवेगळ्या योजना मिळवून देवू व त्यांच्या अडीअडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही नवनिर्वाचित उपसरपंच अश्विनी बनसोडे यांनी दिली.
स्वागत सरपंच मंगल हरिभाऊ केसकर यांनी केले.
निवडीनंतर ग्रामदैवत मारुती देवस्थान व छत्रपती शिवराय ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर व तथागत गौतम बुद्ध आदींना अभिवादन,वंदन व पूजन करून केले. त्यानंतर ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी ओपन जीप मधून पारंपरिक हलगीच्या गजरात मिरवणूक काढली.
          यावेळी पिंपळी गावचे सरपंच मंगल केसकर,उपसरपंच आबासाहेब देवकाते पाटील, छत्रपती कारखाना संचालक संतोषराव ढवाण पाटील,बारामती खरेदी विक्री संघाचे मा.व्हा.चेअरमन भाऊसाहेब भिसे, ग्रामपंचायत मा.उपसरपंच राहुल बनकर, ग्रामपंचायत सदस्य अजित थोरात,वैभव पवार,उमेश पिसाळ ग्रामपंचायत सदस्या स्वाती ढवाण  पाटील,मंगल खिलारे,ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे तसेच अशोकराव ढवाण पाटील,बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे,तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मिलिंद मोरे,सोसायटी मा.व्हा.चेअरमन अशोकराव देवकाते पाटील,रमेशराव देवकाते,अशोकराव  देवकाते पाटील,संजय बनसोडे, हरिभाऊ केसकर,अविनाश निकाळजे, चेतन खोमणे, नंदकुमार बाबर,दत्तात्रय तांबे, अनिल बनकर,बाळासो बनसोडे,सोपान, थोरात, सतीश शिंदे, बबलू खंडाळे  तसेच महिला ग्रामस्थ सावित्री महिला प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष स्नेहा थोरात, ज्योत्स्ना गायकवाड,पुनम थोरात, मानींनी थोरात,अंजना खोमणे,कौशल्या थोरात,बेगम इनामदार,सोनाली बनसोडे,रुपाली भोसले,दिपाली लोंढे,सुप्रिया थोरात, सारिका दडस, उर्मिला वाघ,भारती यादव, प्रियांका नामदास,मेघा गायकवाड, माधुरी धोत्रे,सुरेखा भिसे,लता गायकवाड,सारिका थोरात, मनिषा गायकवाड,मयुरी गायकवाड,सुनिता गायकवाड आदिंसह बचतगटातील महिला व ग्रामस्थ व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
      उपस्थित सर्वांचे आभार अशोकराव ढवाण पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test