Type Here to Get Search Results !

१७ मे जागतिक रक्तदाब दिन; वयाच्या तिशीनंतर वर्षातून २ वेळा रक्तदाब तपासून घेणे- डॉ विद्यानंद भिलारे

१७ मे जागतिक रक्तदाब दिन; वयाच्या तिशीनंतर वर्षातून २ वेळा रक्तदाब तपासून घेणे- डॉ विद्यानंद भिलारे 
सोमेश्वरनगर - १७ मे हा दिवस जागतिक रक्तदाब दिन या दिनानिमित्त  रक्तदाबविषयी माहिती संकलित बारामतीतील सोमेश्वर येथील साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अॅण्ड आय.सी.यु.चे डॉ विद्यानंद मा भिलारे( MD CDM-UK ) बोलताना म्हणाले की...खरे तर रक्तदाबविषयी जास्त जनजागृती केली जात नाही तसेच त्याकडे इतक्या गंभीरतेने पहिले जात नाही पण रक्तदाब जास्त असणे किंवा कमी असणे यातून घातक व जीवघेणे उपद्रव होऊ शकतात , आपण पाहिले रक्तदाब म्हणजे काय ते समजून घेऊ 
रक्तदाब म्हणजे हृदयाने टाकलेले रक्तवाहिन्यावरील दबाव हा दोन पद्धतीने मोजला जातो सिस्टॉलीक व डायस्टलीक , सिस्टॉलीक रक्तदाब म्हणजे आपल्या भाषेत सांगायचे गेले तर वरचा रक्तदाब(हृदयाने रक्तवाहिणीवर टाकलेला जास्तीत जास्त दबाव) व डायस्टोलीक रक्तदाब म्हणजे खालचा रक्तदाब (हृदयाने रक्तवाहिणीवरुण दबाव काढून घेतल्यानंतर राहणारा न्यूनतम दबाव )
आता आपण याची योग्य पातळी किंवा नॉर्मल रेंज समजून घेऊ ,
वरचा रक्तदाब (सिस्टॉलीक) हा 90 mm of Hg ते 120 mm of Hg या मध्ये असेल तर  व खालील रक्तदाब 60 mm of Hg ते 80 mm of Hg च्या दरम्यान असेल तर नॉर्मल समाजाला जातो

१) उच्च रक्तदाब(Hypertension / High BP):-
120 mm of Hg च्या पुढे असणारा सिस्टॉलीक रक्तदाबस व 80 mm of Hg पेक्षा पुढे असणारा डायस्टोलीक रक्तदाबस उच्च रक्तदाब असे म्हणाले जाते.
(120 mm of Hg ते 135 mm of Hg साठी प्राथमिक किंवा स्टेज 1 रक्तदाब असे संबोधले जाते तसेच 136 mm of Hg ते पुढे 180 mm of Hg पर्यंत स्टेज 2 रक्तदाब आणि 180 mm of Hg च्या पुढे अति आत्यायिक रक्तदाब समजाला जातो )
2) अल्प रक्तदाब* (Hypotension / Low BP):-
90 mm of Hg च्या पेक्षा कमी असणारा सिस्टॉलीक रक्तदाबस व 60 mm of Hg पेक्षा कमी असणारा डायस्टोलीक रक्तदाबस अल्प रक्तदाब असे म्हणाले जाते 

वयाच्या ३० नंतर नियमित किमान वर्षातून २ वेळा आवर्जून आपण रक्तदाब तपासून घ्यावा किंवा जेव्हा जेव्हा आपण डॉक्टरांकडे जाता तेव्हा आपल्या रक्तदाबविषयी माहिती घेऊन चर्चा करावी

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test