ऑल इंडिया संपादक संघांची पुणे जिल्हा कार्यकारिणी जाहिर
बारामती: बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ऑल इंडिया संपादक संघाची पुणे जिल्हा कार्यकारिणीची दि.9 मे 2023 रोजी राष्ट्रीय अध्यक्ष करण बौद्ध यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष अंकुश वाकडे यांच्या सूचनेनुसार बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली
पुणे जिल्हा कार्यकारणी पुढील प्रमाणे:- पुणे जिल्हा अध्यक्षपदी स्वप्निल कांबळे, पुणे जिल्हा महासचिव भीमसेन उबाळे, पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष तुषार ओहोळ, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अजय लोंढे, पुणे जिल्हा सचिव गौतम शिंदे, पुणे जिल्हा संघटक निलेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी विविध उपस्थित संपादकांनी मनोगत व्यक्त केले त्यामध्ये प्रामुख्याने संपादक संघटनेची बांधणी पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये करून संघटन अधिक मजबूत करण्यात येईल असे बैठकीत एकमताने ठरले आहे.
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष स्वप्निल कांबळे यांनी संपादकांच्या वृत्तपत्र चालवण्यासाठी येणाऱ्या अडचणी संदर्भात मार्गदर्शन करून प्रश्न सोडवणार तसेच संघटन मजबूत करणार असल्याचे सांगितले.
यावेळी पत्रकार शुभम अहिवळे,दशरथ मांढरे,रणजित कांबळे उपस्थित होते.