ऑल इंडिया संपादक संघाच्या
पुणे जिल्हा अध्यक्षपदी स्वप्निल कांबळे
पुणे : ऑल इंडिया संपादक संघाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी साप्ताहिक बारामती समाचार वृत्तत्राचे संपादक स्वप्निल कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. करण बौध्द यांनी ही नियुक्ती केली आहे. स्वप्निल कांबळे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करित असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.स्वप्निल कांबळे संघाचे नियमांचे अधिन राहून संपादक संघ बळकटीकरिता कार्य करणार असून संघटनेची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेणेसाठी विशेष सहकार्य करणार आहेत.
भारत देशातील आंबेडकरी आणि बहुजन चळवळीत कार्यरत असलेल्या वृत्तपत्रांची देश पातळीवरील ऑल इंडिया संपादक संघ ही राष्ट्रीय संघटना असून पुणे जिल्हातील पत्रकार तथा संपादक स्वप्निल कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.त्यांच्या नियुक्ती बद्दल सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.