"हर हर महादेव कावड" मंडळ खंडोबाचीवाडी येथे
भव्य रक्तदान शिबिर संपन्न.
रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद ;५१ बाटल्यांचे झाले रक्त संकलन
सोमेश्वरनगर - कावड यात्रेनिमित्त खंडोबाचीवाडी ( ता बारामती) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शिबिराचे उद्घाटन गुरुवारी दि ६ रोजी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांच्या हस्ते पार पडले या शिबिरात एकूण ५१ बाटल्या रक्त संकलन झाले पीएसआय ब्लड बँक पिंपरी चिंचवड व हर हर महादेव कावड मंडळ खंडोबाची वाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
खुप दिवसांची परंपरेने चालत आलेल्या कावड यात्रेत खंडोबाचीवाडी ते हरणी या ठिकाणी जाते व हनुमान जयंती दिवशी सकाळी दहा वाजता खंडोबाची वाडी येथे येत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तरुण महिला यांनी या शिबिरास उस्फुर्त सहभाग नोंदवत ५१ बाटल्या रक्त संकलन केले तसेच सायंकाळी ठीक सहा वाजता हरिभक्त पारायण संजय महाराज वेळुकर यांचे कीर्तनाचा कार्यक्रम व रात्री आठ वाजता महा आरतीचा कार्यक्रम त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी "हर हर महादेव" कावड यात्रा खंडोबाचीवाडी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.