आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने माननीय श्री संग्रामभाऊ सोरटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील आजी माजी सैनिक संघटना तालुका बारामती ,सोमेश्वरनगर यांच्या वतीने नवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष तसेच श्री सोमेश्वर साखर कारखाना संचालक माननीय श्री संग्रामभाऊ सोरटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी माजी सैनिकांनी या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या ,तसेच वाढदिवसानिमित्त माननीय श्री संग्रामभाऊ सोरटे हे दर वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याने त्यांचे कौतुक करत आभार मानले तसेच रक्तदान सर्वश्रेष्ठ हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून या शिबिरा सैनिकांनी रक्तदान करत उस्फुर्त वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर ,कार्याध्यक्ष नितीन शेंडकर, सचिव रामदास कारंडे , कोषाध्यक्ष किरण सोरटे ,विक्रम लकडे,रवींद्र कोरडे अन्य सदस्य उपस्थित होते.