बारामतीतील हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पदवीप्रदान समारंभ संपन्न.
हरिभाऊ एज्युकेशन सोसायटी हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल, बारामती येथे शनिवार,दि.२९रोजी अतिशय उत्साहात पूर्व प्राथमिक विभागाचा पदवीप्रदान समारंभ साजरा करण्यात आला.
पदवीप्रदान समारंभास उपस्थित एच.के.जी च्या सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन करून करण्यात आली. पदवीप्रदान समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सुरेंद्र देशपांडे सर उपस्थित होते. त्याचबरोबर.वृंदा देशपांडे ,.एस.एम.दंडवते सर, श्री.किरण वाडीकर सर आणि स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष पी.बी.कुलकर्णी सर यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. सर्व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
हसत-खेळत शिक्षण या अंतर्गत वर्षभर राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे सादरीकरण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करून त्याची माहिती पालकांना देण्यात आली.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सोनाली क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. प्रमुख पाहुणे सुरेंद्र देशपांडे सर यांनी शाळेत घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांचे आणि त्यात सक्रिय सहभाग घेऊन नवनवीन गोष्टी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. तसेच शिक्षकांची व पालकांची जबाबदारी याविषयीही त्यांनी अतिशय छान मार्गदर्शन केले. शाळेत राबवल्या जाणाऱ्या स्तुत्य उपक्रमांचे कौतुक करत शाळेच्या पुढील वाटचालीसाठी उपस्थित पाहुण्यांनी शुभेच्छा दिल्या.
रंगोत्सव सेलिब्रेशन तर्फे आयोजित इंटरनॅशनल Drawing आणि Handwriting Competition मध्ये ही आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.या स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्रक व मेडल देऊन कौतुक करण्यात आले.
एच.के.जीच्या सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विशेष गुणांचे कौतुक करून पाहुण्यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्रक आणि भेटकार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांचे अविस्मरणीय क्षण टिपण्यासाठी सेल्फी कॉर्नर ही उभारण्यात आला होता. तेथे विद्यार्थ्यांनी सेल्फी घेण्याचा आनंद लुटला.
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेली कामे सुरळीत पार पाडली.
अशाप्रकारे पदवीप्रदान समारंभ आणि पारितोषिक वितरण समारंभ अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.