सुनील वेदपाठक यांचा कलाविष्कारातून एकाच विषयावर लक्ष केंद्रित करून कला सादर करण्याची प्रेरणा मिळते:शिल्पकार प्रमोद कांबळे
दिनांक ७ एप्रिल रोजी प्रख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे बालगंधर्व कलादालन येथे प्रख्यात चित्रकार सुनील वेदपाठक जिल्हा न्यायाधीश यांच्या चित्रकृतीच्या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभात ते बोलत होते. सुनील वेदपाठक यांच्या चित्रकृती या कलाक्षेत्रातील अनेक व्यक्तींना एकाच विषयावर लक्ष केंद्रित करून काम करण्याचे प्रोत्साहन देतात.
चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी मा. मुरली लाहोटी प्रख्यात चित्रकार हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला मा. श्याम चांडक प्रमुख जिल्हा न्यायाधीश हे अध्यक्ष होते.
माननीय मुरली लाहोटी यांनी शुभेच्छा देताना सांगितले की कलाकार हा सामान्य माणसाला जे दिसतं ते चित्रित करतोच परंतु सामान्य माणसाच्या न दिसणाऱ्या भाव विश्वाचे सुंदर चित्रण प्रत्येक कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून करत असतो. श्री वेदपाठक यांची कला ही एकाच मोर या विषयावर समर्पित असून कल्पनेतील मोर त्यांनी साकारलेले आहेत. या कला प्रकारातील कला साधताना हजारो चित्र त्यांनी काढले असून त्या प्रत्येकामध्ये वैविधता आहे. कला ही जीवन समृद्ध करण्याचा मार्ग असून श्री सुनील वेदपाठक यांचे कला ही उत्तुंग दर्जाचे कलाविष्कार प्रकट करणारी आहे .
या कार्यक्रमाला मा. उमाकांत जी दांगट सेवानिवृत्त महसूल आयुक्त, मा भगवंतराव मोरे मा. पुष्कराज पाठक मा डॉ. के एच संचेती मा डॉ. बी डी जाधव, गंगाराम पाटील पी सी बागमार , जिल्हा न्यायाधीश पुणे , तसेच महाराष्ट्रातील अनेक कलाकार बीड जिल्ह्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने या प्रदर्शनास सहभागी झाले. पुणेकरांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळत आहे. सदरचे प्रदर्शन हे दिनांक ७,८,९ एप्रिल रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. रसिकांनी या चित्र प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा.