चैत्र नवरात्र, रमजान, अक्षय तृतीया, ईद एकत्र हिंदू-मुस्लिम धार्मिक् ऐक्याचा असाही
योगायोग...!
हिंदुची चैत्र नवरात्री व मुस्लिमांचा पवित्र रमजान महिन्याला एकत्र प्रारंभ झाला आहे. नवरात्रीतील उपवासाला ज्या प्रकारे हिंदू धर्मात महत्व आहे. त्याचप्रमाणे रमजान महिन्यातील उपवासाला मुस्लिम समाजात महत्व आहे. यावर्षी चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली असून, ३० मार्च रोजी समाप्ती होणार आहे. २२ एप्रिलला अक्षय तृतीया आहे तर त्याच दिवशी रमजान महिना पूर्ण होणार असल्याने चंद्र दर्शनानंतर ईद साजरी करण्यात येणार आहे. हा हिंदू, मुस्लिम धार्मिक ऐक्याचा योगायोगच म्हणावा लागेल.
नवरात्रीचे उपवास वर्षातून दोनदा येतात. एक चैत्र
नवरात्री तर दुसरा आक्टोबर मधील अश्विन शुध्द
तृतीयापासून सुरु होणारा नवरात्रोत्सव. पहिल्या
नवरात्रीची समाप्ती रावनवमी तर दुसऱ्या नवरात्रीची
समाप्ती विजयादशमीला होते. नवरात्रीचे उपवास
सुध्दा कडक स्वरुपाचे असतात. काही भाविक निर्जल तर काही भाविक चोविस तासात एकदाच ताक किंवा दुधाचे सेवन करुन उपवास करतात. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यातील उपवासालाही फार महत्व आहे. या उपवासाचा शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे.यालाच 'रमजान'चा अर्थात 'बरकती'चा महिना म्हणतात. एक दुसऱ्याच्या मनातील दरी कमी करुन परस्परामध्ये स्नेहभाव, सदभाव वाढविणारा हा महिना संयम, त्याग, शांती, सहिष्णुता, प्रामाणिकपणा माणसाच्या ठायी रुजविणारा हा महिना मानन्यात येतो. माणसाला वाईटापासून वासनेपासून दूर ठेवणारा हा महिना आहे. या महिन्यात इस्लामने दानधर्माचे महत्व सांगीतले आहे. त्यामुळे या महिन्याच्या समाप्तीनंतर येणाऱ्या ईदला 'ईद-उल- फित्र' असे देखील म्हटले जाते. रमजान रमजान महिन्यातच इस्लामचे पवित्र ग्रंथ असलेले 'कुराण' अवतरीत झाले, अशी मुस्लिम बांधवांची श्रध्दा आहे. रमजान महिन्यात कमालीचे उत्साहाचे वातावरण असते. सांयकाळी बाजारपेठेत पदार्थ, फळे खरेदीसाठी वर्दळ असते. या महिन्यात फळे, सुकामेवा, खजूर या वस्तुंना अधिक मागणी असते.