निंदनीय कृत्य... त्या जेष्ठ पत्रकारास गुंडाच्या टोळक्याकडून अमानुषणे मारहाण.
पत्रकारांकडून निषेध व्यक्त...आरोपींना तत्काळ अटक करत त्यांच्यावर कठोर शिक्षाची मागणी
पुरंदर तालुक्यात पिसर्वे येथील प्रामाणिक जेष्ठ पत्रकारास गुंडाच्या टोळक्याकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी पोलिसांकडून सासवड येथील एका नामचीन गुंडासह त्याच्या साथीदारांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सासवड पोलीस ठाण्याकडून दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दि.७ एप्रिल रोजी साय. सव्वा पाचच्या सुमारास पत्रकार संदीप बनसोडे हे आपल्या मामाच्या दुचाकीवरून सासवडहून पिसर्वेला जात होते.या दरम्यान एखतपूर चौफुल्याजवळील रस्त्यावर दोन मोठे गतिरोधक असल्याने त्यांचे मामा दत्तात्रेय वाघमारे यांनी आपल्या दुचाकीचा वेग कमी केला होता.मात्र त्याच वेळी पाठीमागून आलेल्या स्कर्पिओने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली.यावेळी झालेल्या अपघाताचा संदीप बनसोडे यांनी जाब विचारला असता स्कर्पिओतील बापू जाधव ( रा.सासवड )यासह त्याच्या सहा ते सात अज्ञात साथीदारांनी संदीप बनसोडे यांसह त्यांचे मामा दत्तात्रेय वाघमारे यांना लाथा बुक्यांनी तसेच लोखंडी रॉडने मारहाण करून दुखापत केली आहे.
या घटनेची फिर्याद संदीप बनसोडे ( वय ४८ रा.पिसर्वे ) यांनी सासवड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.त्यानुसार पोलिसांनी बापू जाधव यासह त्याच्या अज्ञात साथीदारांच्या विरोधात भा.द.वी. १४३,१४७,१४८,१४९,तसेच ३२४,२७९,३३७,४२७ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.मात्र सर्वच आरोपी फरार आहेत.
या प्रकरणाचा अधिक तपास सासवडचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एल.वाय.मुजावर हे करीत आहेत.
चौकट :
पत्रकारांकडून निषेध व्यक्त...
जेष्ठ पत्रकार संदीप बनसोडे यांना नामचीन गुंड बापू जाधव व त्याच्या साथीदारांनी केलेल्या अमानुष मारहाणीचा तालुक्यातील पत्रकारांनी तीव्र निषेध व्यक्त केला.तसेच आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी देखील केली.