आनावश्यक खर्च टाळत सामाजिक उपक्रम राबवत "बारामती प्रभात" या वृत्तपत्राचा द्वितीय वर्धापन दिन साजरा.
साई सेवा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड आय सी यु (वाघळवाडी) मार्फत प्राजक्ता मतिमंद निवासी शाळा,सुपे येथील विध्यार्थी यांची आरोग्य तपासणी
सोमेश्वरनगर - साई सेवा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड आय सी यु यांच्या संयुक्त विद्यमाने प्राजक्ता मतिमंद निवासी शाळा शाळा सुपे येथील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी करत व त्यांना अल्पोपार देत "बारामती प्रभात" या वृत्तपत्राचा द्वितीय वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी साई सेवा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉ राहुल शिंगटे आणि डॉ.विद्यानंद भिलारे प्राजक्ता मतिमंद निवासी शाळा सुपा येथील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करत एक आगळावेगळा पद्धतीने "बारामती प्रभात" या वृत्तपत्राचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला
प्राजक्ता मतिमंद निवासी शाळा सुपा येथील विद्यार्थी यांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि त्यांची सेवा करत असलेल्या शाळेतील शिक्षक याचेही आभार मानत आपणही समाज्याचे काही तरी देणे लागतो या भावनेतून झालेल्या कर्यक्रम प्रसंगी
साई सेवा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड आय सी यु (वाघळवाडी) चे डॉ राहुल शिंगटे,डॉ विद्यानंद भिलारे बोलताना म्हणले की या गरजू मुलांना जी आरोग्य सेवा लागेल ती आम्ही हॉस्पिटलमाध्यमातून देणार असल्याचे सांगितले आणि अनावश्यक खर्च टाळत योग्य पद्धतीने " बारामती प्रभात "द्वितीय वर्धापनदिन अश्या ठिकाणी केल्याने संपादक विनोद गोलांडे व सर्व टीमचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी जीवन साधना फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष जयरामअप्पा सुपेकर यांनी आपल्या मनोगतात बोलताना म्हणाले की प्राजक्ता मतिमंद निवासी शाळा येथे "बारामती प्रभात" वृत्तपत्राचा वर्धापन दिन शाळेतील मुलांसोबत केला असल्याने कौतुक थाप एक पत्रकार या नात्याने देत शुभेच्छा दिल्या याप्रसंगी शुभांगी सुपेकर ( मुख्याध्यापिका), विशेष शिक्षक प्राजक्ता बसाळे, गणेश भूजबळ, प्रवीण दुर्गे, आणि विद्यार्थी काळजीवाहक गणेश बारवकर,जयश्री शिंदे तसेच
भारतीय पत्रकार संघ अध्यक्ष काशिनाथ पिंगळे सहसचिव सुशील अडागळे , M न्यूज मराठी चे संपादक व डिजिटल मीडिया एक संघ, महराष्ट्रा संस्थापक अध्यक्ष मधुकर बनसोडे सुपे येथील पत्रकार सचिन पवार, दीपक जाधव , मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली पुणे जिल्हाअध्यक्ष- नागेश कालिदास जाधव सचिव - सोमेश हेगडे,सहसचिव -अमोल भांडवलकर, संघटक ज्ञानेश्वर वाघ,सदस्यप्रताप सुदाम बामणे,बारामती तालुका प्रसिद्धी प्रमुख फिरोज भालदार,फलटण तालुका उपाध्यक्ष- तेजस् भिसे सह मान्यवर उपस्थिती होते.