आजी-माजी सैनिक संघटना व स्पोर्ट अकॅडमी यांच्यावतीने विविध क्षेत्रातील यश संपादन केलेल्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ संपन्न.
सोमेश्वरनगर - आजी-माजी सैनिक संघटना बारामती तालुका सोमेश्वरनगर व स्पोर्ट अकॅडमी यांच्यावतीने आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील यश संपादन केलेल्याचा कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा, विद्यार्थ्यांचा, खेळाडूंचा सत्कार सन्मान करण्यात आला. यामध्ये संघटनेचे सचिव रामदास कारंडे यांनी महाराष्ट्र पोलीस दलात मुंबई लोहमार्ग पोलीस पदी निवड.. संदीप जगताप यांनी पिंपरी चिंचवड पोलीस पदी निवड , चेतन कोळपे यांचेही नवी मुंबई पोलीस पदी त्यांची नियुक्ती बद्दल सत्कार करण्यात आला. तसेच आपल्या संघटनेचे कार्याध्यक्ष नितीन शेंडकर यांची मुलगी कुमारी वैष्णवी नितीन शेडंकर हिने इंटरनॅशनल चित्रकला स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला ही स्पर्धा चार देशांच्या मध्ये आयोजित केलेली होती या स्पर्धेमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका व भूतान असे चार देश होते त्यामध्ये तिचा द्वितीय क्रमांक आला त्याबद्दल तिचं कौतुक आणि गुणगौरव करण्यात आला. तसेच आपल्या परिसरातील सुजल सावंत हा खेळाडू तीन किलोमीटर मध्ये राज्यस्तर स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवलेला खेळाडू याची राष्ट्रीय फेडरेशन कप साठी तामिळनाडू येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झालेले आहे त्याबद्दल सोमेश्वर स्पोर्ट अकॅडमी च्या वतीने गुणगौरव सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आजी माजी सैनिक संघटना संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ लकडे, अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, सोमेश्वर स्पोर्ट अकॅडमी अध्यक्ष भाऊसो लकडे, अँड गणेश आळंदीकर, रामचंद्र शेलार , राजाराम शेंडकर , दत्तात्रय चोरगे , बाळासाहेब गायकवाड, नितीन शेंडकर, रामदास कारंडे , सुभेदार मोहन गायकवाड , सुभेदार तानाजी भंडलकर ,संदीप जगताप,. विक्रम लकडे
,तुकाराम सोरटे ,. चव्हाण साहेब
तसेच विवेकानंद अभ्यासिकेचे संस्थापक गणेश सावंत ,कुमारी वैष्णवी शेंडकर,खेळाडू सुजल सावंत सह मान्यवर उपस्थित होते.