मला कट का मारला करणावरून हातातील लोखंडी कडे मारहाण प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सोमेश्वरनगर - मिळालेल्या माहिती नुसार मोरगाव ता.बारामती गावचे हद्दीत राहुल रणदिवे याचे घराजवळ तु मला कट का मारला असे विचारले असता अक्षय काकडे याने फिर्यादीस शिवीगाळ केली तेव्हा त्याचे बरोबर असणारे तेजस चौरंगनाथ तावरे, स्वानंद रेवननाथ साळुंखे यानीही फिर्यादीस धक्काबुक्की करून तेजस तावरे याने त्याचे हातातील लोखंडी कडे माझे उजवे हातावर मारले व स्वानंद रेवननाथ साळुंखे याने रस्त्याचे कडेला पडलले दगड हातात घेवुनफिर्यादीचे पाठीत मारला व अक्षय काकडे याने हाताने मारून शिवीगाळ दमदाटी केली.वगैरे मजकुरची फिर्यादी वरुन वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात सदरचा गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा.JMFC कोर्ट बारामती यांचे कोर्टात रवाना करण्यात आला असुन .पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स फौ वाघोले हे करीत आहेत .