दुधात भेसळ करण्याचे लिक्विड वडगाव निंबाळकर मधील ...त्या व्यतिकडून आणल्याचे सांगितले ......आणि
सोमेश्वरनगर - पोलिस हवालदार नवनाथ सावंत पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण हे पोलीस ठाणे हद्दीत दि १६ रोजी रात्रगस्त करीत असताना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास टाटा इंट्रा, अशोक लेलँड अशी दोन संशयित वाहने नवीन वाखरी-गुरसाळे बायपास फ्लाई ओव्हर पुलाजवळ दिसून आली. त्यामधील टाटा इंट्रा टेम्पोमध्ये दूध भरण्याचे रिकामे १९ कॅन व दुसऱ्या अशोक लेलँड टेम्पोमध्ये निळ्या रंगाचे प्लास्टिकचे १४ कॅन त्या मध्ये पांढऱ्या रंगांचे लिक्विड भरलेले दिसून आले. त्यावेळी टेम्पो जवळ असणारे तीन तरुण १. निलेश बाळासाहेब भोईटे वय ३० वर्ष रा. रो हाऊस क्रमांक ३८, वृंदावनम सोसायटी, टाकळी. २. परमेश्वर सिद्धेश्वर काळे वय ४० वर्ष रा. काळे मळा, फुलचिंचोली. ३. गणेश हनुमंत गाडेकर वय २५ वर्ष रा. सुरेंद्र कुलकर्णी यांचे घरी, गणेश नर्सरी जवळ, टाकळी रोड, पद्मावती, पंढरपूर हे तिघे आढळून आले.
सदर बाबत तिघांकडे दुधाचे रिकामे कॅन व प्लास्टिकच्या कॅनमध्ये असलेले पांढरे लिक्विड याबाबत सखोल चौकशी केली असता सदरचे लिक्विड समीर मेहता रा. वडगाव निंबाळकर ता. बारामती यांचेकडून दुधात भेसळ करण्याकरता आणलेले आहे असे सांगितलेले आहे.
सदर बाबत अन्न व औषधी प्रशासन विभाग यांना कळविण्यात आले असून सदर विभागाचे पथक पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण येथे आले असून त्याचे नमुने घेण्यात आले आहेत.
सदर बाबत अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.