स्तुत्य उपक्रम ! वृक्षारोपण करत पत्रकार बनसोडे यांनी केला वाढदिवस साजरा
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील निंबुत येथील पत्रकार मधुकर बनसोडे (संस्थापक अध्यक्ष डिजिटल मीडिया एक संघ महाराष्ट्र राज्य) नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर असतात अशी त्यांची ओळखही आहे ,विविध क्षेत्रातील व विविध संघटनांमध्ये ते समाज प्रबोधन तसेच विविध उपक्रमांमध्ये ते नेहमीच सक्रिय असतात असे असताना त्यांचा गुरुवार दि २७ रोजी असणारा वाढदिवस ते वृक्षारोपण करत साजरा केला, पत्रकार बनसोडे मित्रपरिवार तसेच डिजिटल मीडिया एक संघ चे पत्रकार बांधव तसेच जेष्ठ पत्रकार बांधवांनी प्रत्यक्ष तसेच संपर्क करत शुभेच्छा बद्दल बनसोडे यांनी त्यांचे आभार मानले असे त्यांनी बोलताना सांगितले तसेच निंबुत तेथील बौद्ध विहार येथे ऑक्सिजन देणारे एक वडाचे झाड लावून आपला वाढदिवस साजरा केला,तसेच तरुणांनपुढे एक आदर्श ठेवला असल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.