पहाटे रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू...!
मिळालेल्या माहिती नुसार दिनांक २१/०४/२०२३ रोजी, येऊर वनपरिक्षेत्रातील परिमंडळ नागला, नियतक्षेत्र सारजामोरी सर्वे क्रमांक ६६ च्या वनहद्दीलगत जाणा-या दिवा वसई रेल्वे ट्रॅकवर, रेल्वेच्या धडकने बिबट नराचा मृत्यु पहाटे ३ ते ४ वाजेदरम्यान झाले असल्याचे
रेल्वेचे गँगमनने भ्रमणध्वनीद्वारे कळविले. तात्काळ या विभागातील अधिकारी व
कर्मचारी तसेच मानद वन्यजीव रक्षक, ठाणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली
असता, मृत नर बिबटचे शव असलेल्या परिसराचा पंचासमक्ष घटनास्थळ पंचनामा
नोंदविला. सदर बिबटयाची नखे, दात व इतर महत्वाचे अवयव सुस्थितीत आढळून
आले असून, सदर बिबटयास मोठा अपघात झाल्याने, सदर बिबटयाचे पाय तुटले असून
मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. शवविच्छेदनाकरीता सदर मृत विवट
नराचे शव शासकीय वाहनाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथील पुशवैद्यकीय
दवाखान्यामध्ये नेण्यात आले. सदर बिबट नराच्या शवाचे शवविच्छेदन वरिष्ठ
वनअधिकारी, क्षेत्रीय वनकर्मचारी, मानद वन्यजीव रक्षक, ठाणे यांच्या उपस्थितीमध्ये
पशुवैद्यकीय अधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली व विकृती शास्त्रतज्ञ, मुंबई
पशुवैद्यकीय महाविद्यालय यांनी केले. सदर नर बिबट अंदाजे ३ ते ४ वर्षाचा असून, या
विभागाकडील उपलब्ध माहितीकोष नुसार, सदर नर बिबट हा C-४५ असल्याची
ओळख पटली. तसेच सदर नर बिबटयाचा दिनांक २०/०१/२०२२ रोजी, विहार चौकी
जवळील कॅमेरा ट्रॅपमध्ये शेवटचा फोटो दिसून आला होता. सदर नर बिबटयाचे
शवविच्छेदन केल्यानंतर शवास अग्नी देण्यात आला व पुर्ण शव जळून नष्ट झाले.
तसेच सदरच्या शवविच्छेदनांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यातील निष्कर्ष
खालीलप्रमाणे आहेत.
post mortem findings were suggestive of mechanical trauma
due to vehicle (probably train) accident resulting into complete
cutting of both hind legs, left fore leg, resulting in severe blood
loss and subsequent hypovolemic shock as a immediate cause of
death.
उपसंचालक (उत्तर) येऊर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,
बोरीवली.