शासकीय फोटोझिंको ग्रंथागार भांडार पडताळणीमुळे आठवडाभर बंद
पुणे : शासकीय फोटोझिंको मुद्रणालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या ग्रंथागाराची वार्षिक भांडार पडताळणी 17 ते 21 एप्रिल 2023 या कालावधीत होणार असल्याने या कालावधीत शासकीय ग्रंथागार बंद राहील, असे मुद्रणालयाचे व्यवस्थापक स. ह. केदार यांनी कळविले आहे.