सुपे ! भारतीय पत्रकार संघाच्या वतीने पोलीस नाईक दत्तात्रय धुमाळ यांचा सत्कार
बारामती - बारामती तालुक्यातील सुपे बाजार मैदानालगत असलेल्या महालक्ष्मी ज्वेलर्स या सराफी दुकानावर पिस्तुलातून गोळीबार करत सशस्त्र दरोड्याचा प्रकार शुक्रवारी (दि. ३१) रोजी सायंकाळी घडला होता. चार जणांच्या टोळीने हा दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. यातील एकाला सतर्क ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने तात्काळ ताब्यात घेण्यात आले होते. अन्य लोक फरार झाले होते.
घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, वडगाव निंबाळकरचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांनी तत्काळ भेट दिली.
या घटनेच्या चौकशीनंतर आरोपींना जेरबंद करण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी, वडगाव निंबाळकर पोलीस व सुपा दूरक्षेत्रातील पोलीस यांना यश आले.
त्यामुळे सुपा पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख व पोलीस नाईक दत्तात्रय धुमाळ यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा भारतीय पत्रकार संघाच्या वतीने सुपा याठिकाणी नुकताच सत्कार करण्यात आला.
यावेळी भारतीय पत्रकार संघाचे बारामती तालुका अध्यक्ष काशिनाथ पिंगळे, उपाध्यक्ष विनोद गोलांडे, सुशीलकुमार अडागळे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.