वाल्हेत वारकरी सेवा संघातर्फे बाल संस्कार शिबिराचे आयोजन
भारतीय पत्रकार संघाचे लीगल विंगचे प्रदेशाध्यक्ष Adv कैलास पठारे यांनी २० हजार किंमतीची विठ्ठलासह रुक्मिणी मूर्ती महर्षी वाल्मीकी गुरुकुल आश्रमाला भेट
वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाब वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील महर्षी वाल्मीकी वारकरी सेवा संघातर्फे लहान मुलांकरिता येत्या १ ते १५ मे पर्यंत विनामूल्य अध्यात्मिक बाल संस्कार शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष ह.भ.प.अशोक महाराज पवार यांनी दिली.
वाल्हे नजीक सुकलवाडी येथील विठोबा नवले मैदानात नव्याने उभारलेल्या महर्षी वाल्मीकींच्या गुरुकुल आश्रमाचे उद्घाटन येत्या ३० एप्रिल रोजी ह.भ.प. माधवजी महाराज रसाळ यांच्या हस्ते व जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याने वारकरी संप्रदायात उत्साहाचे वातावरण आहे.
अशातच १ मे पासून पंधरा दिवस लहान मुलांसाठी बाल संस्कार शिबिराअंतर्गत पखवाज वादन, हरिपाठ, ग्रंथ पाठांतर, वारकरी सांप्रदायिक भजन, शाररिक व्यायाम, पूजा प्रार्थना, संत चरित्र तसेच गायन आदी कार्यक्रम विनामूल्य घेतले जाणार असल्याने शालेय विद्यार्थ्यांनी देखील या उपक्रमास विशेष पसंदी दर्शवली आहे.
चौकट : पत्रकार संघाकडून मूर्तींची भेट
भारतीय पत्रकार संघाचे लीगल विंगचे प्रदेशाध्यक्ष अॅड.कैलास पठारे यांनी तब्बल २० हजार किंमतीची विठ्ठलासह रुक्मिणी देवीची मूर्ती महर्षी वाल्मीकी गुरुकुल आश्रमाला भेट दिल्याने सर्वसामान्य वर्गासह राजकीय वर्तुळात देखील स्तुत्य चर्चा रंगली आहे.