बारामती ! सम्मान सोशल फौंडेशन चा उपक्रम आदर्शवत - सुनील महाडिक.
बारामती -गुरुवार दि. १३ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न प.पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बारामती नगर परिषद 8 नंबर शाळा येथे विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सुनील महाडिक पोलीस निरीक्षक बारामती शहर, जयसिंग देशमुख मा. नगरसेवक ,मा.गणेश गुरव साहेब व सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्षेत्रातील सर्व मान्यवर तसेच 8.नं. BoyZzz Group चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
सम्मान सोशल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. यंदाही महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधत शालेय साहित्य वाटप आणि अन्नदानाचा कार्यक्रम व प्राण्यांसाठी वनविभागाच्या पाणवठ्यावर टॅन्करने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
यावेळी बारामती नगरपरिषद शाळा क्रमांक 8 चे मुख्याध्यापक श्री नीलकंठ कापसे व सर्व शिक्षक वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी बोलताना सुनील महाडिक यांनी सर्व महापुरुषांचे कार्य व त्यांना प्रेरित असलेला समाज याविषयी विध्यार्थ्यांना व उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. सम्मान सोशल फौंडेशनच्या वतीने घेण्यात आलेला उपक्रम आदर्शवत असून अशाच प्रकारे जयंती साजरी केली पाहिजे. व महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढं चालवला पाहिजे.
उपस्थित मान्यवरांचे आभार गणेश लंकेश्वर यांनी मानले.