Type Here to Get Search Results !

माजी सैनिक रामदास कारंडे यांची मुंबई लोहमार्ग पोलीस पदी निवड

माजी सैनिक रामदास कारंडे यांची मुंबई लोहमार्ग पोलीस पदी निवड 
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील होळ( कारंडेमळा ) येथील रामदास दशरथ कारंडे यांची  मुंबई लोहमार्ग पोलीस पदी निवड झाली ते माजी सैनिक असून त्यांनी सतरा वर्ष देश सेवा यशस्वी पार पाडली आहे ,ते शेतकरी कुटुंबातील असल्याने  परिस्थितीत अत्यंत हलाखीची महत्वाचे म्हणजे करांडे यांची जिद्द चिकाटी आणि पोलीस दलात भरती होण्याची  प्रबळ  इच्छामुळे  भरती झालो असल्याचे करांडे यांनी बोलताना सांगितले  या यशप्राप्ती साठी  योग्य मार्गदर्शन योद्धा करिअर अकॅडमी चे महेंद्र जमदाडे , विवेकानंद अभ्यासिका गणेश सावंत आणि आजी-माजी सैनिक संघटना मधील सर्वच पदाधिकारी यांचे बहुमुल्य मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले तसेच पोलीस दलातील त्यांचे जेष्ठ बंधू संदीप कारंडे यांनीही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले .या निवडीबद्दल सोमेश्वर नगर परिसरातील विविध संस्था, अकॅडमी तसेच विविध क्षेत्रातून  रामदास कारंडे यांचा मान सन्मान आणि अभिनंदनाचा वर्ष्याव होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test