सोमेश्वरनगर ! वातावरणातील सततच्या बदलांमुळे साथीचे आजारात वाढ
सोमेश्वरनगर- कडक ऊन, मध्येच ढगाळ स्थिती, हलकासा पाऊस किंव्हा तसे दमटवातावरण अश्या सततच्या वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार वाढले आहेत. थंडी, ताप, खोकला, थकव्याने रुग्णही बेजार झाले असल्याने जिल्ह्यसह बारामती तालुक्यासह ग्रामीण भागातील दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे.
मार्च,एप्रिलमधील कडक ऊन, ढगाळ वातावरण, काही ठिकाणी होणाऱ्या पावसामुळे कधी उष्णता, तर कधी हवेतील गारवा असे वातावरण निर्माण होत आहे. परिणामी थंडी, ताप, खोकला आदी आजार वाढू लागले आहेत.
दवाखान्यात जाण्याऐवजी आजार अंगावर काढणे, योग्य ती काळजी न घेणे, पोषक आहार नसणे, वेळीच योग्य ती दक्षता न घेणे यामुळे आजाराचे प्रमाण गंभीर होत आहे. बारामती शहरासह ग्रामीण भागातील दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत आहे. दमट वातावरणत मच्छरांमुळे डेंगीची लागणही काही ठिकाणी झाली आहे. सोमेश्वरनगर हद्दीतील ही लागण नियंत्रणात राहावी म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांनी औषध फवारणीही करणे किंव्हा त्यावर उपाययोजना असणे गरजेचे आहे त्यातच ग्रामीण भागात सर्वत्रच यात्रेचा माहुल आहे त्यामुळे लवकरात लवकर उपाययोजना होणे गरजेचे आहे असे नागरिकांकडून बोलले जात आहे. शिवाय उन्हाची तीव्रताही वाढली आहे. परिणामी धुरळा उडण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांवरून मोठी वाहने गेल्यास त्यातून हवेत धुरळा पसरत असल्याने त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला तसेच श्वसनाच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे.