Type Here to Get Search Results !

महापुरूष जयंतीदिनी अनावश्यक खर्च टाळत मतिमंद विद्यार्थ्यांना दीले स्नेहभोजन.बारामती तालुका फुले प्रहारचा स्तुत्य उपक्रम.

महापुरूष जयंतीदिनी अनावश्यक खर्च टाळत मतिमंद विद्यार्थ्यांना दीले स्नेहभोजन.

बारामती तालुका फुले प्रहारचा स्तुत्य उपक्रम.
बारामती : शैक्षणिक क्रांतीचे जनक क्रांतिबा महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती मिरवणुकीत होणारा वायपट खर्च टाळुन फुले प्रहार चे संस्थापक अध्यक्ष सुधाकर बोराटे व पुणे जिल्हाध्यक्ष संतोष नेवसे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली बारामती तालुका फुले प्रहार संघटनेच्या वतीने कर्‍हावागज (ता.बारामती)
येथील मुकबधिर शाळेतील मतिमंद मुलांना स्नेहभोजन व खाऊचे वाटप करण्यात आले.जयंती मिरवणुकीतील वायपट खर्च टाळुन मतिमंद विद्यार्थ्यांना जेवन देणार्‍या फुले प्रहार संघटनेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत नागरिकांतुन व्यक्त होत आहे. 

        गणेश भानुदास गायकवाड(अध्यक्ष,बारामती तालुका फुले प्रहार संघटना), राहुल आगम (बारामती तालुका उपाध्यक्ष), अभिजित गोरे(बारामती शहराध्यक्ष),विकास बाळासाहेब म्हेत्रे(बारामती शहर युवाध्यक्ष),अक्षय बाळासो शिंदे(बारामती शहर उपाध्यक्ष), सुयोग लक्ष्मन गायकवाड (बारामती शहर युवा उपाध्यक्ष),अमित झगडे(बारामती शहर संघटक),इ.सर्वांनी मिळुन फुले प्रहार संघटनेच्या माध्यमातुन समाज उपोयोगी उपक्रम राबवत कर्‍हावागज येथील निवासी मुकबधिर शाळेतील मतिमंद विद्यार्थ्यांना गुरू-शिष्य यांचे संयुक्त जयंती निमित्त खाऊ वाटप व स्नेहभोजन दीले.शाळेतील एकुण ५५ मतिमंद विद्यार्थी व गूरूजणांना जेवण देण्यात आले.याप्रसंगी सावता माळी तरूण मंडळाचे अध्यक्ष शिवाजी जाधव, बारामती समता परिषद अध्यक्ष प्रदिप लोणकर, श्रीराम डेव्हलपर्स चे उद्योजक दीपक (शेठ)कुदळे, श्रीगोंदा आरपीआय तालुकाध्यक्ष अमोल (भैया) रणसिंग,
सावता माळी तरुण मंडळाचे कार्याध्यक्ष निकी आगम व जयंत शिंदे इत्यादीं उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test