विद्या प्रतिष्ठानच्या सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये रोटरी क्लब ऑफ बारामती व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ यांच्या वतीने जागतिक वसुंधरा दिन साजरा.
सोमेश्वरनगर - जागतिक तापमानवाढीचे परिणाम आपण आता भोगतच आहोत. मानवी कारणामुळेच हे संकट अधिक आव्हानात्मक झाले आहे. यामुळे उद्याच्या पिढीची अधिक काळजी वाटते आहे. बालकांना भविष्यात सुंदर निसर्ग मिळावा म्हणून आजपासूनच पर्यावरण रक्षण करणे आवश्यक आहे. छोट्या छोट्या कृतींनी आपापला सहभाग नोंदवून पर्यावरण रक्षणाचे ध्येय साध्य करूया, असे आवाहन 'एनव्हायरमेंट फोरम ऑफ इंडिया'च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.
येथील विद्या प्रतिष्ठानच्या सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये रोटरी क्लब ऑफ बारामती व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ यांच्या वतीने जागतिक वसुंधरा दिनाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी रोटरी क्लब बारामतीचे अध्यक्ष रो.डॉ. अजय दरेकर होते. याप्रसंगी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या "पर्यावरण संवर्धन पोस्टरनिर्मिती स्पर्धा", "माझं झाड माझं बाळ" स्पर्धा, "कचऱ्यातून नवनिर्मिती", *घरगुती विज्ञानातून पर्यावरण संवर्धन" अशा विविध विषयांवर रोटरीने आयोजित केलेल्या स्पर्धेत राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर क्रमांक मिळविलेल्या बारामती तालुक्यातील 87 पुरस्कार्थी मुलांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी रो.गौरी शिकारपूर, रो.राजेंद्र सराफ, रो अरविंद गरगटे, रो. दर्शना गुजर, रो प्रकाश सुतार, रो. सुरेंद्र गुप्ता, रो.संतोष परदेशी, मुख्याध्यापक सचिन पाठक, दत्ता माळशिकारे, बाबूलाल पडवळ, धनंजय गायकवाड उपस्थित होते. तसेच पर्यावरणासाठी भरीव कार्य केल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ कॅन्टोमेंट, ई डायमंड, बारामती, रॉयल, शनिवारवाडा यांचा तसेच रोहा सेन्ट्रल व बारामती रोट्रॅक्ट क्लब यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात पर्यावरण अभ्यासक रो.प्रमोद जेजुरीकर माजी प्रांतपाल रोटरी डिस्ट्रिक्ट 3131यांनी, पर्यावरणाकही हानी झाल्याने आपल्या रोजच्या जगण्यात संकटे निर्माण होत आहेत. पुढील पिढीला निसर्ग, पृथ्वी नीट सोपविणे आपले काम आहे. जगातल्या सर्व चांगल्या गोष्टींचा आस्वाद त्यांना घेता आला पाहिजे. यासाठी मी काय करणार? हे महत्त्वाचे आहे. पण केवळ
झाडे लावणे म्हणजे रक्षण नव्हे .केमिकल व इंधन वापर घटविणे, वीजबचत, विजेच्या पर्यायी साधनांचा वापर अशा गोष्टींचे उपाय आवश्यक आहेत.
फोटो - सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथे शालेय विद्यार्थ्यांचा सन्मान करतेप्रसंगी मान्यवर