सोमेश्वरनगर ! साई सेवा मल्टीस्पेशलिटी आयसीयू मार्फत दर सोमवारी शिवभक्तांसाठी सोमेश्वरमंदिर परीसरात केली जाते मोफत आरोग्य तपासणी
आरोग्य तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा- डॉ विद्यानंद भिलारे
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे असणाऱ्या साई सेवा मल्टीस्पेशलिटी आयसीयू यांच्यामार्फत दर सोमवारी येणाऱ्या शिवभक्तांसाठी सामाजिक बांधिलकी जपत सोमेश्वरमंदिर परीसरात मोफत आरोग्य तपासणी डॉ राहुल शिंगटे आणि डॉ विद्यानंद भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटल मधील डॉक्टर आणि स्टाफ यांच्या माध्यमातून सोमेश्वर दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी ब्लड, बीपी, शुगर , टेम्प्रेचर आणि गरज असेल तर एसीजी अशी मोफत आरोग्य तपासणी करत असतात या आरोग्य तपासणीमुळे अनेकांना आपले आजार , कमजोरी निदर्शनात आल्याने व त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे या उद्देशाने दर सोमवारी मंदिर परिसरात ही तपासणी केली जाते या तपासणीमुळे महिला ,नागरिक तसेच जेष्ठ नागरिक जलसमाधान व्यक्त करत साई सेवा मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल वाघळवाडी यांचे आभारही मानत आहे.
आत्तापर्यंत या आरोग्य तपासणी शिबीरात सोमेश्वरनगर पंचक्रोशीतील शेकडो नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली असल्याची महिती हॉस्पिटल प्रशासनाणे बोलताना तदिली