बारामती ! निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी उत्पन्नाचे दाखले जमा करण्याचे आवाहन
बारामती: बारामती तालुक्यातील संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांनी ३० जून पर्यंत उत्पन्नाचे दाखले जमा करण्याचे आवाहन तहसिलदार गणेश शिंदे यांनी केले आहे.
लाभार्थ्यांनी तहसिलदार उत्पन्न दाखले काढून आपापल्या गावातील तलाठी कार्यालयात जमा करावेत. जे लाभार्थी ३० जून पूर्वी दाखले जमा करणार नाहीत त्यांना योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान बंद करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.