मननीय श्री.संग्रामभाऊ तानाजीराव सोरटे"यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
"रक्तदान करुया आणि प्रेमाची नाती जोडुया" सोरटेवाडी येथे "भव्य रक्तदान शिबिर" आयोजन
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील रक्तदान जीवन दान हे सर्वश्रेष्ठ दान या संकल्पनेने अक्षय ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने व मा.श्री.संग्रामभाऊ तानाजीराव सोरटे"अध्यक्ष, नवनाथ उद्योग समुह / संचालक श्री सोमेश्वर सह.सा.का.लि. सोमेश्वरनगर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम तसेच भव्य रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले आहे.
"रक्तदान करुया आणि प्रेमाची नाती जोडुया" या म्हणी प्रमाणे रविवार दि. २३ रोजी सकाळी ८ ते सायं. ५ पर्यंत वाजेपर्यंत रक्तदान शिबीर ग्रामपंचायत कार्यालय, सोरटेवाडी येथे आयोजित केले आहे तसेच या रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे तरी इच्छुकांनी रक्तदान करावे असेही आयोजकांनी नम्र आव्हाहन केले आहे.
स्थळ - ग्रामपंचायत कार्यालय, सोरटेवाडी ता.बारामती