शिवसेना सहकार सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष पदी अॅड. अनंत वसंतराव सकुंडे यांची निवड
मुंबई - शिवसेना सहकार सेना महाराष्ट्र राज्यच्या राज्य अध्यक्ष पदी माजी केंद्रीय मंत्री शिवसेना नेते आनंदराव अडसूळ तर कार्यकारणीमध्ये महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष पदी अॅड. अनंत वसंतराव सकुंडे यांची निवड महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संमतीने करण्यात आली,अॅड. अनंत वसंतराव सकुंडे हे बारामती तालुक्यातील वाघळवाडी गावचे सुपुत्र आहेत या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर व सोमेश्वर पंचक्रोशीतील नागरिकाकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
शिवसेना सहकार सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष अँड. आनंद यादव( पश्चिम महाराष्ट्र , उत्तर महाराष्ट्र ,मराठवाडा,पश्चिम विदर्भ, कोकण),सरचिटणीस शिवाजी पाटील, उपाध्यक्ष प्रा नागेश वनकळसे, खजिनदार प्रमोद पार्टे, महिला विभाग सचिव सौ सारिका दानवे विभागीय सचिव उत्तर महाराष्ट्र डॉ अमित जोशी, विभागीय सचिव मराठवाडा विजयकुमार मदने,विभागीय सचिव कोकण जाधव साहेब, विभागीय सचिव पश्चिम महाराष्ट्र सुरज काळे (ग्रा) हे इंदापूर गावचे सुपुत्र आहेत तसेच विभागीय सचिव पश्चिम महाराष्ट्र माधव कुलकर्णी (श), यांची पदाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. सहकार क्षेत्रातील पुढील सर्व निवडणुका शिवसेना लढीवणार आहे.