सोमेश्वरनगर ! मु.सा. काकडे महाविद्यालयाला बेंगलोर येथील नॅक समिती भेट देणार.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मु. सा. काकडे महाविद्यालयास बेंगलोर येथील नॅक समिती सोमवार दि.१७ व मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी भेट देणार आहे अशी माहिती महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी दिली. राष्ट्रीय मुल्यांकन व प्रमाणिकरण परिषद (नॅक) ही
राष्ट्रीय अनुदान आयोगाची स्वायत्त संस्था असून देशातील उच्च शिक्षण देणाऱ्या सर्व
महाविद्यालयाचे दर पाच वर्षांनी मूल्यांकन करून त्यानुसार दर्जा दिला जातो. उच्च शिक्षणाचा
दर्जा वाढविणे, टिकून ठेवणे व एकूणच शैक्षणिक नियंत्रण ठेवण्याचे काम नॅक संस्थेच्या
माध्यमातून केले जाते. महाविद्यालयाचे मूल्यांकन करण्यासाठी नॅकने एकूण सात विभागाचे
निकष ठरवून दिलेले असून त्यामध्ये अभ्यासक्रम, अध्यापन अध्ययन आणि मूल्यमापन,
संशोधन व विस्तार कार्यक्रम, भौतिक सुविधा अध्ययन साधने, विद्यार्थी समर्थन, सुविधा,
व्यवस्थापन व नेतृत्व गुण, सामाजिक मुल्य व उत्तम असणान्या दैनदिन प्रॅक्टीसेस आणि
महाविद्यालयाचे वेगळेपण इत्यादी सात निकषांवर आधारित महाविद्यालयाचे मूल्यांकन केले जाते.
मागील मूल्यांकन तपासणीत महाविद्यालयाला २.८० गुण असून बी. प्लस प्लस (B++) ही
श्रेणी आहे. परंतू मागील पाच वर्षात संस्थेचे अध्यक्ष मा. सतिशभैया काकडे देशमुख व
महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. अभिजितभैया काकडे -देशमुख यांच्या
मार्गदर्शनाखाली सर्व सन्मानीय व्यवस्थापन समितीने विविध इमारतीची व भौतिक सुविधांची
उपलब्धता केल्याने व सर्व शैक्षणिक उपक्रम राबविल्याने या वेळेस महाविद्यालयास A श्रेणी
मिळेल अशी अपेक्षा मा. अध्यक्ष सतिशभैया काकडे-देशमुख यांनी व्यक्त केली. या नॅक
समितीची सर्व तयारी झाली असून आम्ही समितीला आत्मविश्वासाने सामोरे जाणार आहोत
अशी माहिती महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजित काकडे यांनी दिली.
नॅक प्रक्रियेतील संपूर्ण माहिती नॅक समन्वयक प्रा. डॉ. संजू जाधव यांनी दिली.