सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील होळ( कारंडेमळा ) येथील रामदास दशरथ कारंडे यांची मुंबई लोहमार्ग पोलीस पदी निवड झाल्याबद्दल योद्धा करिअर अकॅडमी (सोमेश्वरनगर )यांच्यावतीने रामदास कारंडे यांचा सन्मान पत्रकार विनोद गोलांडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला ... कार्यक्रम प्रसंगी बोलताना अकॅडमी विद्यार्थ्यांना कारंडे म्हणाले की भरती व्हायचं असेल तर जिद्द चिकाटी आणि पोलीस दलात भरती होण्याची प्रबळ इच्छा असणे तितकेच महत्वाचे आहे तसेच आम्ही माजी सैनिक कौटुंबिक जबाबदाऱ्या असून देखील परत भरती होऊ शकतो तर तुम्ही का ? नाही होऊ शकत त्यामुळे न खचता मेहनत करा फळ आपोआप भेटेल असेही ते बोलताना म्हणाले तसेच सत्कार व मान सन्मान दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
या सत्कार प्रसंगी योद्धा करिअर अकॅडमी चे महेंद्र जमदाडे ,माजी सैनिक नितीन शेंडकर ,गणेश शेंडकर ,लतीफ इनामदार सचिन कारंडे , पत्रकार विनोद गोलांडे तसेच योद्धा करिअर अकॅडमी चे विद्यार्थी व कर्मचारी वृंद उपस्थित होते