सुप्यातील प्राथमिक शाळेतील मुलांचा कलाविष्कार
सुपे- बारामती तालुक्यातील सुपे येथील प्राथमिक शाळा क्रमांक २ मधील विद्यार्थ्यांनी कला गुण सादर करुन वार्षीक स्नेहसंमेलनात उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.
या कार्यक्रमात मराठी हिंदी मिळुन एकुण १९ नवी जुनी गाणी सादर करण्यात आली. तसेच यावेळी गाण्यांमधुन साकारलेल्या फुले, आंबेडकर, छत्रपती शिवराय, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी बोस, भारतमाता, जिजाऊ, झाशीची राणी, सावित्रीबाई यांच्या भूमिकांना येथील चोखंदळ रसिकवर्गाची भरपूर दाद मिळाली.
तर वेड लावलयं, चंद्रा, इडा पिडा टळू दे, दैवत छत्रपती तसेच पुष्पा, बैलगाडा शर्यत ही गाणी खास आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली. अतिशय उत्कृष्ठ वेशभूषा व अभिनय यांनी परिपूर्ण ठरलेले हे वार्षीक स्नेहसंमेलन सुपेकरांसाठी पर्वणी ठरले.
या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका विद्या जाधव, उपशिक्षक सचिन लवांडे, शितल कुसाळकर व माया क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांची तयारी परिपुर्ण केली होती.
या कार्यक्रमाचे उद्घाटन येथील सरपंच स्वाती हिरवे, उपसरपंच मल्हारी खेरे, माजी सभापती शौकत कोतवाल यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ग्रा. पं. सदस्या ज्योती जाधव, असिफ कोतवाल, भिमा वाघचौरे, श्रीकांत व्यवहारे, सुधीर स्वामी, शहाजी कुंभार , अशोक कुतवळ, गणेश लोणकर, ए. जी. सकट आदी उपस्थित होते.