वाल्हे प्रतिनिधी (सिकंदर नदाफ ) ग्रामीण भागातील महिलांना स्वस्तात सॅनेटरी पॅडची व्यवस्था व्हावी यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवदिग्विजय प्रतिष्ठानच्या वतीने पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे महिलांसाठी सॅनेटरी पॅड मशीनचे लोकार्पण करण्यात आले आहे.
यावेळी हेल्पिंग हॅन्ड फाऊंडेशन पुरंदर यांच्या सहकार्यातून व कलश महिला बचत गटाच्या सहभागातून वाल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या मशीनची उभारणी करण्यात आली आहे .दरम्यान आशा स्वयंसेविका रोहिणी पवार तसेच आरोग्य सहाय्यक तेजस्विनी पवार यांच्या हस्ते या सॅनेटरी पॅड मशीनचे उद्घाटन करण्यात आले तर या ठिकाणी महिलांना अवघ्या पाच रुपयात सॅनेटरी पॅड उपलब्ध होणार असल्याचे स्वप्नाली देशपांडे यांनी जाहीर केले.
याप्रसंगी शिवदिग्विजय प्रतिष्ठानचे अतिश जगताप सचिन देशपांडे तसेच सामाजिक कार्यकर्ते देविदास भोसले माजी सरपंच महादेव चव्हाण प्रा.अनिल भुजबळ यांसह सुशांत पवार भगवान भुजबळ शीतल पवार पूर्वा राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■
आशा स्वयंसेविकांसाठी आरोग्य पुस्तिका
हेल्पिंग हॅन्ड फाऊंडेशन पुरंदरचे अध्यक्ष सचिन पवार उपाध्यक्ष मंगेश टिळेकर तसेच सचिव विधीतज्ञ सागर गायकवाड आदी मान्यवरांच्या विशेष प्रयत्नातून महिलांना सॅनेटरी पॅड मशीनसह मासिक पाळीबद्दल शास्त्र शुद्ध माहिती व्हावी या उद्देशाने येथील आशा स्वयंसेविकांना किशोरी आरोग्य पुस्तिकांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अतिश जगताप यांनी दिली.