सोमेश्वरनगर ! उन्हाचा तडाखा वाढतोय , शीतपेयांना मागणी
केवळ स्वादच नाही तर, ‘या’ फायद्यांसाठी ' लिंबू पाणी ' पिणे आवश्यक..!
सोमेश्वरनगर- अशी काही पेये आहेत, जे बहुतेक उन्हाळ्यात प्यायल्यास उन्हाळ्यातील समस्या दूर करण्यास मदत होते. उदाहरणार्थ, उन्हाळ्याच्या काळात, आम्लपित्त, मळमळ किंवा अपचन यासारख्या समस्या उद्भवतात, अशा परिस्थितीत ही लिंबू पाणी प्रभावी मानले जाते. "लिंबू पाणी" हे असेच एक पेय आहे, जे उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवण्यासाठी वापरले जाते.
त्याचप्रमाणे उन्हाळ्यात लिंबू-पाणी प्यायल्याने न केवळ थकवा दूर होतो तर स्थूलपणा कमी होण्यासही मदत होते. रोज सकाळी लिंबूपाणी प्यायल्याने पोटही साफ होते तर दुपारच्या ऊष्णतेतून शरीर ला थंडावही देते असे महत्त्व असल्यामुळे उन्हाळ्यात शहरी भागासह ग्रामीण भागात लिंबूसरबत ची मागणी वाढताना दिसत आहे
असे बोलताना करंजेपुल येथील लिंबु सरबत व्यावसायिक यादव यांनी माहिती दिली.
दरवर्षी लिंबू सरबत व्यावसाय करणे म्हणजे या व्यवसायातून अनेक नागरिकांचे शरीरातील आजार लिंबू सरबत पिल्याने दूर होतात याचे मला समाधान आहे.म्हणून मी सोमेश्वर करखाना रोड लगत जुन्या चिंचेच्या झाडा खाली लिंबू सरबत चे स्टॉल लावत असतो.
व्यवसायिक वाल्मिक यादव करंजेपुल,सोमेश्वरनगर(ता. बारामती)