करंजे येथे 'छत्रपती शिवाजी महाराज' यांच्या जयंतीनिमित्त.
रविवार दिनांक ५ मार्च रोजी "सोमेश्वर प्रीमियर लीग २०२३" आयोजित स्पर्धेचे उदघाटन.
सोमेश्वर-करंजे - "सोमेश्वर प्रीमियर लीग २०२३" छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भरवण्यात आलेली या स्पर्धेचे उद्घाटन रविवार दिनांक ५ मार्च २०२३ रोजी सकाळी नऊ वाजता करंजे ( ता बारामती) येथील एसएम गलांडे पाटील स्टेडियम मगरवाडी रोड या ठिकाणी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक ऋषी गायकवाड, वाणेवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्या सोनाली निकम, परिसरातील बांधकाम व्यवसायिक धीरज गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अनिल हुंबरे यांचे शुभहस्ते आणि बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वर कारखान्याचे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप, पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रमोदकाका काकडेदेशमुख, विद्यमान संचालक संग्राम सोरटे, राजवर्धन शिंदे, अभिजीत काकडे-देशमुख, प्रवीण कांबळे, करंजेपुल पोलीस चौकीचे पीएसआय योगेश शेलार , माजी संचालक रमाकांतजी गायकवाड, तसेच करंजे पंचक्रोशीतील सर्व नागरिक यांचे उपस्थितीत होणार आहे. तरी सर्व शिवप्रेमींनी, क्रिकेट प्रेमींनी आणि नागरिकांनी उपस्थित रहावे ही विनंती.