बारामती ! जागतिक महिला दिन जळोची येथे उत्साहात साजरा
बारामती: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत गुरुवार दि.९ मार्च २०२३ रोजी जळोची सजग नागरिक ग्रुपच्या वतीने महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचा सन्मान करून जळोची प्राथमिक शाळा येथे महिलांचा सत्कार करण्यात आला.
स्त्री कर्तुत्वाचा या कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला सौ.अमृता भोईटे सौ.कुसुम बगाडे,सौ.ज्योती मासाळ,सौ.लिक्ष्मीप्रभा करे,सौ.वनिता सातकर,सौ.पुजा रसाळ,सौ.डाॅ. गीतांजली शिंदे,सौ.सुनिता मलगुंडे
सौ.पुनम पागळे,पत्रकार पल्लवी चांदगुडे,विस्तार अधिकारी सौ.वंदना भंडारे,सौ.जुमाना शेख,मुख्याधापिका व शिक्षिका सौ.सिमा चांदगुडे, सौ.लक्ष्मी कणसे,सौ.मनिषा इंगुले,सौ.स्वाती भोसले,अंगणवाडी सेविका सौ.भारती शिंदे,विजया जगताप यानां सन्मानपत्र देऊन सत्कार सन्मान करण्यात आला.
पोलीस हवालदार सौ.अमृता भोईटे (निर्भया पथक/भरोसा सेल) यांचे महिला सुरक्षा अदृश्य धोके या विषयावर व्याख्यान झाले.प्रत्येक घरातील स्त्री ही एक शक्तीपीठ असून तिचा आदर केल्यास समाजातील अन्याय, अत्याचार आपोआप संपेल, असे त्यांनी सांगितले.यावेळी सौ.पुजा रसाळ,सौ.पुनम शेरे,सौ.वनिता सातकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी किशोर मासाळ,अँड.अमोल सातकर,मानसिंग सुळ,अक्षय शेरे,किशोर शेंडगे,किरण फरांदे,अमोल पिसाळ,गणेश पागळे,पत्रकार योगेश नालंदे,श्रीरंग जमदाडे,दादा देवकाते,विजय जमदाडे धनंजय जमदाडे,नवनाथ मलगुंडे,दादा शिरसट,अनिल गायकवाड,गणेश मासाळ तसेच जळोची ग्रामस्थ उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन जळोची सजग नागरिक ग्रुपच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते,स्वप्निल कांबळे,महेंद्र गोरे,मा.नगरसेवक शैलेश बगाडे,जब्बार शेख,यांनी केले होते.सुत्रसंचालन लक्ष्मीकांत अवचट सर यांनी केले तर आभार स्वप्निल कांबळे यांनी मानले.