मुढाळे येथे जागतिक महिला दिन साजरा
मुढाळे प्रतिनिधी( शंतनू साळवे)
मुढाळे ता. बारामती येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे (बुधवार दि.८) जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
महिला दिनाचे औचित्य साधून मुर्डेश्वर महिला ग्रामसंघ पदाधिकारी व सदस्य यांनी एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालय येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून महिला दिन उत्साहात साजरा केला. यावेळी ग्रामसंघाचे पदाधिकारी, सदस्य व अंगणवाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
महिला दिनानिमित्त सोमेश्वर विद्यालय मुढाळे येथे बचत गट याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींना मुर्डेश्वर महिला ग्रामसंघ यांच्याकडून बचत गट, बचत गटाची कामे, बचत गटाचे महत्व याची माहिती देण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक, मुर्डेश्वर महिला ग्रामसंघाचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.