..ते कागदपत्रांसह पैश्याचे गहाळ पाकीट दिल्याने 'मदने' यांचे कौतुक.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर येथे असणाऱ्या वैभव हॉटेल समोर रस्त्यावर विजय पवार ह्या एका ड्रायव्हर चे गाडी चालवत असताना खिस्त्यातून गहाळ झालेले पाकीट नानासाहेब मदने याना रस्त्यावर पडलेले सापडले. त्यावेळी नानासाहेब यांनी ते पाकीट उचलून त्यामध्ये त्याचा फोन नंबर आहे का हा बघितला आणि नंबर मिळताच नानासाहेब यांनी लगेचच त्याला फोन करून बोलवुन घेतले.
आणि त्यामधील सर्व ओळख पटवुनच त्यामधील रोख रक्कम ६ हजार ३०० रुपये व आधार कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स, व इतर सर्व कागदपत्रासह पाकीट नानासाहेब मदने यांनी त्याच्या स्वाधीन केले..
यावेळी नानासाहेब यांनी त्याला विचारले की तू इतक्या लहान वयात गाडी का चालवतोय त्यावेळी तो म्हणाला की मी बारामती जवळील पिपळी या गावात रहात असून मी अतिशय गरीब कुटुंबातील मुलगा आहे. मी आणि माझी आई फक्त कुटूंबात राहतोय. माझे वडिल लहान असताना च वारले आहेत त्यामुळे मला हे काम असले काम करावे लागतय..
मी गोंदवले येथील आश्रम शाळा येथे शिकलो आहे..
नानासाहेब मदने यांनी माझे घहाळ झालेले पाकीट व त्यामधील सर्व रक्कम व सर्व कागदपत्र सह मला परत आहे अशी मिळवून दिली त्याबद्दल मी नानासाहेब यांचे मनापासून आभार मानतो..