सोमेश्वरनगर ! बारावी बोर्ड परीक्षा मु सा काकडे महाविद्यालयात नियोजनबद्ध स्वरूपात सुरु.
सोमेश्वरनगर : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या वार्षिक परीक्षेस २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला, कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी महाविद्यालयात व प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता ही भरारी पथके परीक्षा केंद्रांवर अचानक भेट देणार आहे. त्यामुळे कॉपीबहाद्दरांवर वचक बसणार असला तरी कॉपीमुक्त परीक्षा केंद्र ठेवण्यासाठी मु सा काकडे महाविद्यालयात तत्पर असल्याचे प्राचार्य देविदास वायदंडे यांनी बोलताना सांगितले संचालकांनाही काळजी घ्यावी घेत आहेत.
बारामती तालुक्यातील मु.सा. काकडे महाविद्यालय शिस्तीच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर असतात त्यामुळे प्राचार्य पदाची धुरा देविदास वायदंडे यांनी हाती घेतल्यापासून तर कॉलेजची एक वेगळीच ओळख निर्माण झालेली आहे कॉलेजला येणारा विद्यार्थी हा क्लासरूम मध्येच बसला पाहिजे अन्यथा कॉलेज करून त्या विद्यार्थ्यावरती कारवाई केली जाते.
त्याचाच फायदा आज बारावीच्या परीक्षेला होत आहे या परीक्षा दरम्यान परीक्षेला बसण्या अगोदर येणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने महाविद्यालयीन शिक्षक घेत तर त्यांना परीक्षा हॉल मध्ये सोडतात
मु.सा.काकडे महाविद्यालयाच्या रुसा बिल्डिंगमध्ये बारावीची परीक्षा पार पडत आहे. रुसाची स्वतंत्रपणे बिल्डिंग आहे त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शांततेचे वातावरण मिळत आहे व त्यामुळे कॉलेजच्या नियमित कामकाजात देखील कोणतीही अडचण निर्माण होत नाही.
रुसा बिल्डिंगच्या बाहेर व मु.सा.काकडे महाविद्यालय परिसरामध्ये वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व करंजेपूल दूरक्षेत्र पोलीस निरीक्षक योगेश शेलार यांच्या सूचनेनुसार कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे. बारावीची परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी मु.सा.काकडे महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे नेहमीच प्रयत्न असतात.
महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतिश काकडे-देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात परीक्षा सुरळीत पार पडल्या जात आहेत.