एस एस सी बॅच २०११ आणि एच एस सी बॅच २०१३ चा माजी विद्यार्थ्यां मेळावा संपन्न.
शिष्यवृत्ती परीक्षांसाठी आवश्यक असणारी पुस्तके शाळेला भेट.
सोमेश्वरनगर - आश्रमशाळेत राहिल्यामुळे आयुष्याला चांगली दिशा मिळाली, बाहेरच्या जगात वावरायचे कसे, वास्तवाच्या जगात व्यवहार कसे चालतात आणि त्यामुळे आयुष्यात सदैव आश्रमशाळेतील शिक्षणाची साथ मिळाली, अशा भावना बारामती तील वाघळवाडी येथील एस एस सी बॅच २०११ आणि एच एस सी बॅच २०१३ चा माजी विद्यार्थी मेळावा प्रसंगी विद्यार्थ्यांनी भावना व्यक्त केल्या. हा आश्रमशाळेतील स्नेह मेळावे फक्त शिक्षकांची माजी विद्यार्थ्यांना भेट घालून देत नाहीत तर माजी- आजी विद्यार्थी यांचा मनमोकळा संवाद चालत असतो. विद्यार्थी सध्या वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत, तरीही पुन्हा शाळेची भेट घ्यावीशी वाटते, ही शाळेची यशस्वीता आहे, असे प्रतिपादन प्राचार्या रोहिणी सावंत यांनी व्यक्त केले. या भेटीनिमित्त माजी विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेतील मुलांना मिष्टान्न भोजन तसेच शिष्यवृत्ती परीक्षांसाठी आवश्यक असणारी पुस्तके भेट दिली.
यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वला जगताप यांनी केले आणि आभार रोहिदास कोरे यांनी मानले.