दौंड ! प्रभू रामचंद्रांचा आदर्श घेणे ही काळाची गरज - चैतन्य महाराज शिंदे.
दाैंड-सिद्धटेक - दौंड तालुक्यातील शिरापूर नजीक रामवाडी ता.दाैंड जिल्हा पुणे.येथे रामजन्माेत्सवाचा कार्यक्रम संपन्न.
शिरापूर येथील वारकरी संप्रदायीक कुटूंबातील ह.भ.प.हनुमंत संपत कापसे व त्यांच्या परिवाराच्या वतीने गेली ७ वर्षांपासून प्रभू रामाच्या जन्मात्सवाच्या निमित्ताने दाेन दिवशीय अखंड हरिनाम यज्ञाचे आयाेजन केले जाते.रामजन्माच्या दुस-या दिवशी काल्याचे किर्तन करुन भाविकांना महाप्रसादाचे वाटप करुन सप्ताहाची सांगता हाेते.
रामजन्माच्या निमित्ताने ह.भ.प.चैतन्य महाराज शिंदे यांनी प्रभू रामचंद्र यांच्या जन्माच्या कथेचे निरुपन करत असताना ते म्हणाले की,दशरथ राजाकडून श्रावण बाळाचा झालेला वध व श्रावण बाळाच्या अंध मातापित्यांनी दशरथ राजाला पुत्र वियाेगाने मृत्यू हाेईल असा दिलेला शाप याची राेमहर्षक कथा भाविकांना सांगून वशिष्ठ ऋषींनी दशरथ राजाला पुत्र प्राप्तीसाठी पुत्र कामिष्ठी यज्ञ करायला सांगून त्या यज्ञाच्या प्रसादाने रामजन्मांची कथा भाविकांना सांगून भाविकांची मने जिंकली.राम हा एक वचनी व एक पत्नी असा आदर्श राजा हाेता. त्यांचा आदर्श आजच्या पिढीने घेतला पाहिजे असे शेवटी ते म्हणाले.रामजन्माच्या नंतर सर्व भाविकांना प्रसाद म्हणून खिचडी व थंड पेयाचे वाटप करण्यात आले. यावेळी माेठया संख्येने भाविक,गायनाचार्य,मृदंगाचार्य,टाळकरी,विनेकरी उपस्थित हाेते.