...म्हणून होळी सण करतात
कणकेच्या ...त्या आकृत्या करून होळीत टाकाव्यात
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे. होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, अशी विविध नावे आहेत.
होळीच्या दिवशी अंगणातील थोडी जागा सारवून
त्याभोवती रांगोळी काढून त्यामध्ये शेणाच्या गव-या,
एरंडाच्या झाडाची एक फांदी उभी करावी.
त्याभोवती लाकडे, शेणाच्या गव-या रचून त्याची
पूजा करून पुरणपोळीचा नैवद्य दाखवावा. नंतर
होळी पेटवावी.
नंतर हातात पाणी घेऊन 'मी व माझे कुटुंब यांना
सुखशांती मिळावी म्हणून होळीचे पूजन करतो'
असा संकल्प करावा. घरातील विस्तवाने होळी
पेटवावी. त्यानंतर खाली दिलेला मंत्र म्हणून तीन
प्रदक्षिणा घालाव्यात.
अस्तपाभयसंत्रस्तै:कृत्वा त्वं होलि बाहलशैः |
अतस्त्वा पूजयिष्यामी भुते भूतिप्रदा भवः ||
प्रसाद म्हणून खोब-याची वाटी किंवा नारळ भाजून तो सर्वाना वाटावा.त्याचप्रमाणे घरात त्रास देणाऱ्या जीव कीटकांच्या कणकेच्या आकृत्या करून त्या होळीत टाकाव्यात म्हणजे ते किटाणू नष्ट होतात