करंजेतील ग्रामदैवत भैरवनाथ व जोगेश्वरी मातेच्या नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व शिखरावर कलशारोहन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजे येथील ग्रामदैवत भैरवनाथ व जोगेश्वरी मातेच्या नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा गुरुवारी दि. २३ रोजी सरपंच जया गायकवाड व पती संताजी गायकवाड या उभयतांच्या हस्ते करण्यात आली तसेच पुरोहित म्हणून प्रभाकर बोकिल व त्यांचे सहकारी यांनी मंत्रपठण मंदिर परिसरात केले. संपूर्ण मंदिर परिसर पुष्प सजावटीने भरलेला होता व विद्युत रोषणाई केलीली होती.
गुरुवारी सकाळी श्रीच्या नवीन मुर्ती ची भव्य ग्राम- मिरवणूक मोठ्या उत्साहात, ताश्यांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत काढण्यात आली तसेच मंदिराच्या शिखरावर कलशारोहन महादेव महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी करंजे पंचक्रोशीतील ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते तसेच मंदिर जीर्णोद्धार कमिटीने सर्वांच्या सहकार्याने महाप्रसादाचे आयोजन समस्त भाविकांसाठी करण्यात आले तर सोमेश्वर-करंजे परिसरातील सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला