Type Here to Get Search Results !

..अफुची शेती करणाऱ्या इसमांवर मोठी कारवाई

...अफुची शेती करणाऱ्या इसमांवर मोठी कारवाई

इंदापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक श्री दिलीप पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाले की, मौजे पळसदेव माळेवाडी, ता. इंदापुर, जि. पुणे गावचे हद्दीत शेतकरी  नामे हनुमंत काशिनाथ बनसुडे याने त्याचे शेतात बेकायदा बिगरपरवाना अफु या अंमली पदार्थाचे झाडांची लागवड केलेली आहे. अशी बातमी मिळाल्याने लागलीच सदर बातमीची माहिती  अंकित गोयल, पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण, मा. आनंद भोईटे, अपर
पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, बारामती, मा. गणेश इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती यांना माहिती दिली.सदर बातमीचे अनुशंगाने पोलीस निरिक्षक, दिलीप पवार यांनी पोलीस अधिकारी व पोलीस स्टेशनकडील स्टाफ तसेच महसुल विभाग, राज्य उत्पादन शुल्क, दौंड, पळसदेव कोतवाल यांची टिम बनवुन सदर ठिकाणी जावुन शेतकरी नामे हनुमंत काशिनाथ बनसुडे
याचे शेतात असलेले मक्यामध्ये अफु या अंमली पदार्थाचे लागवड लावलेले ठिकाणी छापा
टाकला असता सदर ठिकाणी मोठया प्रमाणात बेकायदा बिगरपरवाना अफु या अंमली
पदार्थाचे झाडांची लागवड केलेली मिळुन आली. परंतु सदर ठिकाणी हजर असताना माळेवाडी पळसदेव ता. इंदापुर, जि.पुणे या गावातील इसम नामे १) माधव मोतीराम बनसुडे, २) लक्ष्मण सदाशिव बनसुडे, ३) दत्तात्रय मारूती शेलार, ४) राजारामदगडु शेलार यांना अटक करण्यात आली आहे. सर्व रा.माळेवाडी पळसदेव ता.इंदापुर, जि.पुणे यांचेसुध्दा शेतात अफु पिकाची लागवड केल्याची माहिती मिळाल्याने लागलीच सर्व स्टाफसह सदर मिळाले माहिती ठिकाणी जावुन पाहणी केली असता त्यांचे शेतामध्ये पांढरी शुभ्र फुले असणारी व बोंड आलेली झाडे दिसुन आली. पोलीस स्टाफ सोबत असणारे कृषी अधिकारी
सतिश पोपट महानवर यांचेकडुन सदर झाडांबाबत खात्री केली असता ती झाडे प्रतिबंधित केलेली अफुची झाडे असल्याचे खात्री पुर्वक सांगितले. सदर ठिकाणी मा. आनंद भोईटे,अपर पोलीस अधीक्षक, बारामती यांनी भेट देवून कारवाई अनुशंगाने मार्गदर्शन केले.दिनांक ०३/०३/२०२३ रोजी मा. गणेश इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी,
| बारामती यांचे समक्ष तसेच पोलीस स्टेशनकडील अधिकारी, पोलीस स्टाफ तसेच महसुल
विभाग, राज्य उत्पादन शुल्क, दौंड, पळसदेव कोतवाल, पोलीस पाटील यांचे समवेत
कारवाई करून त्यामध्ये अफु या अंमली पदार्थाचे झाडांची बेकायदेशीरपणे विनापरवाना |
व्यापारी / व्यवसायीक हेतुने एकुण ७,०८७ किलो वजनाची एकुण किंमत १,४१,७४,०००
/ – रूपये किंमतीची लागवड केलेली मिळुन आल्याने मुददेमाल जप्त करून तो अंमली
पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ४८ प्रमाणे जागीच नष्ट करणेत आलेला आहे.
इंदापूर पोलीस स्टेशन गु.र.नं २९५ / २०२३, भा.द.वि. कलम २०१, NDPS चे कलम
८, १५, १८, ४६, मधील आरोपी १) काशीनाथ रामभाऊ बनसुडे, वय ६४ वर्षे, २) दत्तात्रय मारूती
| शेलार, वय ३७ वर्षे, ३) राजाराम दगडु शेलार, वय ५० वर्षे, ४) लक्ष्मण सदाशिव बनसुडे,
वय ४० वर्षे, सर्व रा.माळेवाडी पळसदेव ता. इंदापूर, जि.पुणे यांना आज दिनांक
०४/०३/२०२३ रोजी ०१:३० वाजता गुन्याचे तपासकामी अटक करण्यात आले असुन सदर
गुन्हयाचा तपास सहा पोलीस निरिक्षक, महेश माने हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा.श्री. अंकित गोयल, पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण, मा.आनंद
भोईटे, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग पोलीस अधिकार मा. गणेश इंगळे, उपविभागीय
पोलीस अधिकारी, बारामती विभाग, बारामती यांचे मार्गदर्शनाखाली दिलीप पवार, पोलीस
| निरिक्षक, इंदापुर पोलीस स्टेशन, महेश माने, सहा पोलीस निरिक्षक, इंदापुर पोलीस स्टेशन, प्रकाश
पवार, सहा पोलीस निरिक्षक, इंदापुर पोलीस स्टेशन, पी. बी. पोळ, पोलीस निरिक्षक, राज्य उत्पादन
शुल्क, दौंड, एस. एस. मांजरे पोलीस उपनिरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड, सतिश पोपट
महानवर कृषी अधिकारी, इंदापुर, सहा. पो. फौज/ तांबे, पो हवा / माने, पो हवा / खैरे, पो. हवा / वाघ,
पो हवा / जाधव, पो.हवा / बोराडे, पो हवा / फाळके, पो.ना / साळवे, पो.कॉ/ केसकर, महेश विठ्ठल मेटे, तलाठी रा. दाळज नं. २ ता. इंदापुर, जि. पुणे, भारत अभिमान बोंगाणे, कृषी सहायक, इंदापुर,अमोल मधुकर लवटे कृषी सहायक, इंदापुर, गणेश सोनवणे कोतवाल, पळसदेव, कल्पना
जगन्नाथ फुले, पोलीस पाटील, पळसदेव माळेवाडी यांनी केली.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test