सोमेश्वरनगर ! बारामती तालुका साखर कामगार सभा या संघटनेची नवीन कार्यकारणी जाहीर
सोमेश्वरनगर - साखर कामगार सभा या संघटनेची नवीन कार्यकारणी श्री सोमेश्वर कामगार सह.पतसंस्था कार्यालय सोमेश्वरनगर (ता बारामती) येथे शुक्रवार दि ३ रोजी झालेल्या बैठकीत सर्वानुमते जाहीर करण्यात आली
यावेळी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांच्या अध्यक्षतेखाली बारामती तालुका साखर कामगार सभा संघटनेची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.सदर संघटनेच्या उपाध्यक्ष धनंजय खोमणे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली सोमेश्वर यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र तावरे व माळेगाव कारखाना संघटनेचे पदाधिकारी प्रमोद खलाटे , आर टी जगताप , जे के ढवाण पाटील तसेच सोमेश्वर कारखान्याचे संघटनेचे पदाधिकारी बाळासाहेब काकडे, बाळासाहेब गायकवाड , तानाजीराव सोरटे, कैलास जगताप, संतोष भोसले उपस्थित होते. नवीन संघटना कार्यकरणीमध्ये खलील प्रमाणे नवीन सदस्यांची निवड करण्यात आली
१) अनिल जगताप (इंजिअरिंग विभाग)
२) संदीप लोखंडे (शेती विभाग)
३) शहाजी भापकर (स्टोअर विभाग)
४) गणेश भोसले (इंजिअरिंग विभाग)
५) योगेश थोपटे (जनरल विभाग)
६) हेमंत गायकवाड (अकौंट विभाग)
७) प्रकाश थोपटे (डीस्टीलरी विभाग)
८) राजेंद्र जगताप(शुगर गोडाऊन).
यावेळी तात्यासाहेब काळे यांच्या हस्ते सर्व नवीन सदस्यांचा सत्कार केला त्याबरोबर श्री सोमेश्वर कामगार सहकारी पतसंस्था व बारामती तालुका कामगार सभेच्या वतीने नवनिर्वाचित चेअरमन विशाल मगर व व्हाईस चेअरमन जगन्नाथ बनसोडे व स्वीकृत संचालक धनंजय निकम व तज्ञ संचालक राजेंद्र खलाटे तसेच बॉयलर ऑपेरेशन इंजिनिअर परीक्षा उत्तीर्ण झालेबद्दल कारखान्याचे इंजिनिअर सचिन राणे , रणजित कदम, निखिल जगताप यांचा सत्कार मा तात्यासाहेब काळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मा चेअरमन अजित शिंदे ,संचालक राहुल सोरटे,हनुमंत भापकर,जय भोसले,राहुल खलाटे,मच्छिंद्र गवळी,जालिंदर शेंडकर,पतसंस्थेचे सचिव सुधाकर पिसाळ,सहसचिव महेश भोसले उपस्थितीमध्ये सत्कार व अभिनंदन करण्यात आले