तालुक्यातील या वाचनालयास जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथालय पुरस्कार प्रदान
बारामती - सासवड ( ता.पुरंदर ) येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात शनिवार, दि. ५ मार्च २०२३ रोजी पुणे जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने कळंब ( ता.इंदापूर ) येथील शासनमान्य शिव-कल्याण वाचनालयास जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथालय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजयराव कोलते, मा.आमदार उल्हासदादा पवार, प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार यांचेकडून शिव-कल्याण वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष शहाजीराजे भोसले यांनी स्विकारला.
यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, पुणे विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डाॅ.यशवंत पाटणे, मा. आमदार उल्हासदादा पवार, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजयराव कोलते, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार, सोलापुर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजयकुमार पवार, संभाजी झेंडे, माणिक झेंडे, सचिन घोलप व आदी मान्यवर तसेच ग्रंथालयीन पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.