Type Here to Get Search Results !

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मु . सा काकडे महाविद्यालयात मुलींच्या कबड्डी स्पर्धा

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मु . सा काकडे महाविद्यालयात मुलींच्या कबड्डी स्पर्धा 

सोमेश्वरनगर :- मु .सा काकडे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुलींच्या कबड्डी स्पर्धा पार पडल्या सदर स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . देविदास वायदांडे यांनी केले . उद्घाटनापर मनोगतामध्ये त्यांनी मुलींनी मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा स्पर्धेत सहभाग घ्यावा. खेळाकडे करिअर म्हणून पहावे तसेच आपल्या आरोग्यासाठी क्रीडास्पर्धामध्ये सहभाग घेऊन जास्तीत जास्त तंदुरुस्त रहावे .  महाविद्यालयातर्फे मुलींना क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जास्तीत जास्त मदत केली जाईल . क्रीडासाहित्य तसेच स्पर्धेसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा महाविद्यालयातर्फे पुरवल्या जातील जास्तीत जास्त मुलींना या क्षेत्राकडे वळावे असे त्यांनी सांगितले . याप्रसंगी संस्थेचे सहसचिव श्री सतीश लकडे उपस्थित होते . त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. सदर स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.जया कदम डॉ कल्याणी जगताप व महिला प्राध्यापिका उपस्थित होत्या . स्पर्धेत एकूण ६ कबड्डी महिला संघानी सहभाग नोंदवला होता राष्ट्रीय कबड्डी खेळाडू यश गायकवाड यांनी पंच म्हणून काम पाहिले या स्पर्धेचे नियोजन महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागातर्फे करण्यात आले होते. डॉ. बाळासाहेब मरगजे . प्रा.  दत्तराज जगताप कर्मचारी श्री. आदित्य लकडे यांनी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले . महाविद्यालय नियोजन आणि विकास समिती अध्यक्ष श्री अभिजीत भैय्या काकडे देशमुख यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test