विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी कामगिरी...
वैष्णवी नितीन शेंडकर हिला द्वितीय क्रमांक तर समीक्षा संतोष कदम हीस तृतीय क्रमांकाचे बक्षीस
सोमेश्वरनगर - रोटरी इंटरनॅशनल मल्टी डिस्ट्रिक्ट ग्लोबल रिसायकलिंग वर्कशॉप मध्ये विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई, वाघळवाडी(ता बारामती) येथील दोन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले .वैष्णवी नितीन शेंडकर हिला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले तर समीक्षा संतोष कदम हीने तृतीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना दैनंदिन वापरातील विविध टाकाऊ वस्तूंचा वापर करून सृजनात्मक पद्धतीने प्रकल्प करायला सांगितला होता. यामध्ये विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी अतिशय कल्पक प्रकल्पांची मांडणी करत बक्षीस पटकावले. या स्पर्धेच्या दुसऱ्या ऑनलाइन फेरीमध्ये जगभरातून २५ विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी आपले स्थान निर्माण केले. या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका शुभांगी निगडे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले . शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.