दाैंड ! दौड तालुक्यातील गाेरगरीब जनता आनंदाच्या शिध्याच्या प्रतिक्षेत
दाैंड- दाैंड तालुक्यात आनंदाचा शिधा लाभार्थी संख्या १२ हजार ५६४ एवढी असल्याची माहिती दाैंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी दिली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घाेषणे प्रमाणे दिवाळी प्रमानेच गुडी पाडवा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंत्तीनिमित्ताने राज्यातील अंत्याेदय व प्राधान्य याेजनेतील लाभार्थ्यांना १०० रुपयांमध्ये १ किलाे रवा,१ किलाे साखर,१ किलाे चणा डाळ व १ लिटर तेल मिळणार आहे. मात्र राज्य शासनाच्या कर्मचा-यांनी पेन्शन याेजनेचा लाभ मिळावा म्हणून पुकारलेल्या कामबंद आंदाेलनामुळे निविदा उशिरा निघाल्याने दाैंड तालुक्यासाठी येणा-या आनंदाच्या शिध्यामध्ये अडचणी येत आहेत.
दाैंडच्या धान्य गाेडाऊनमध्ये साखर,रवा,तेल व चणाडाळ प्राप्त झाली आहे.मात्र केडगावच्या गाेडाऊमध्ये फक्त चणाडाळ प्राप्त झाली आहे. राज्य शासनाच्या कर्मचा-यांचा संप मिटल्यानंतर ताबडतोब आनंदाच्या शिध्याचे वाटप केले जाणार असल्याचे तहसीलदार संजय पाटील यांनी सांगितले.एकंदरीत शासकीय कर्मचा-यांच्या संपामुळे दाैंड तालुक्यातील सर्व सामान्यांसाठी गाेड पाडव्याचा सण कडू हाेणार असल्याची चर्चा दाैंड तालुक्यात चालू आहे.